काँग्रेसनं लावलेल्या ‘त्या’ फलकाची जोरदार चर्चा, भाजपची डोकेदुखी वाढली !

काँग्रेसनं लावलेल्या ‘त्या’ फलकाची जोरदार चर्चा, भाजपची डोकेदुखी वाढली !

चंद्रपूर – काँग्रेसनं लावलेल्या फलकाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. चंद्रपूर शहरात काँग्रेसनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीतील कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केले होते. त्यामुळे काँग्रेसनं त्यांचे आभार मानले आहेत. चंद्रपूर जिल्हा-शहर काँग्रेस समितीने भागवतांचे आभार मानणारे फलक लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली असल्याचं पहावयास मिळत आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आरएसएसच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी काँग्रेसचे कौतुक केले होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेत्यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले असून अनेक थोर व महान नेते याच पक्षाने भारताला दिले असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. तसेच मोहन भागवत हे मूळचे चंद्रपूरचे असल्यामुळे काँग्रेसनं त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान काँग्रेसनं लावलेल्या या फलकामुळे भाजपची सध्या डोकेदुखी वाढली असल्याचीही चर्चा आहे.

 

COMMENTS