काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव !

काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव !

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून काँग्रेसचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरीमधून पराभव झाला आहे. सिद्धारामय्या यांनी चामुंडेश्वरी आणि बदामी मतदारसंघातून निवडणूक लढवली असून चामुंडेश्वरीमधून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. याच मतदारसंघातून पाचवेळा त्यांनी निवडणूक लढवली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री पदावर असूनही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सिद्धरामय्या कर्नाटकातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 1985 व 1989 साली दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. होळेनरसिंहपूर आणि सतनूर या दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरला होता. 1985 साली ते दोन्ही जागांवर विजयी झाले आणि 1989 साली दोन्ही जागांवर ते पराभूत झाले. मात्र दोन्ही वेळेस ते मुख्यमंत्री नव्हते.

देवराज अर्स यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहाण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळाली तरिही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या वरुणा मतदारसंघातून त्यांचा मुलगा यतींद्र याला संधी दिली आणि ते शेजारील चामुंडेश्वरी विधानसभा मतादरसंघात गेले आहेत. या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून गेले आणि दोन वेळा पराभूत झाले आहेत. 2006 साली त्यांनी येथून शेवटची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना फक्त 257 मते मिळाली होते.

 

COMMENTS