काँग्रेसची 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा सर्व उमेदवारांची नावे !

काँग्रेसची 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा सर्व उमेदवारांची नावे !

नवी दिल्ली – आघाडीचं घोड काही जागांवरुन अडलं असलं तरी काँग्रेसनं 51 जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विद्यमान आमदार आणि दिग्गज नेत्यांची नावे आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पहिल्य यादीमध्ये नाही. त्यांच्या नावाची चर्चा सातारा लोकसभेसाठी चर्चेत असल्यामुळे त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही अशी चर्चा आहे. कुलाब्यातून भाई जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे,

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नीला वरोरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्या मुलाला वांद्रे पूर्व या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. अशोक जाधव यांना अंधेरी पश्चिममधून तिकीट देण्यात आलं आहे. ज्या आमदारांची नावे भाजप किंवा  शिवसेनेत प्रवेशासाठी चर्चेत आहेत. त्या ठिकाणचे उमेदवार अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत.

COMMENTS