लोकसभेसाठी कर्नाटकात काँग्रेस – जेडीएस आघाडीची घोषणा !

लोकसभेसाठी कर्नाटकात काँग्रेस – जेडीएस आघाडीची घोषणा !

बंगळुरू – कर्नाटक विधानभा निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र आलेल्या काँग्रेस आणि जेडीस यांनी आता आगामी लोकसभा निवडणुकही एकत्र लढविण्याचा निर्णय घेतलाय. काल दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बंगळुरूमध्ये बैठक झाली. त्यामध्ये याबाबत निर्णय घेतला. या बैठकीत जागावाटपाबाबत निर्णय झाला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जागावाटपाबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन जागावाटपही लवकरच निश्चित केलं जाईल असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे. काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आल्यामुळे भाजपची कर्नाटकात कोंडी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस जेडीएस आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांनी शपथ घेतल्यानंतर गेले अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर त्याच्यावरही काल तोडगा निघाला. काँग्रेसला 22 मंत्रिपदे तर जेडीएसला 12 मंत्रिपदे मिळणार आहेत. गृह, महसूल, कृषी यासारखी महत्वाची खाती काँग्रेसकडे गेली आहेत. तर वादचं कारण ठरलेलं अर्थ खातं शेवटी जेडीएसकडे गेलं आहे.

COMMENTS