सत्तास्थापनेबाबत काँग्रेस नेत्याचं मोठ वक्तव्य !

सत्तास्थापनेबाबत काँग्रेस नेत्याचं मोठ वक्तव्य !

मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. आमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा सुरु आहे. आम्ही अंतिम निर्णय एकमताने घेऊ. राष्ट्रवादी बरोबर चर्चा झाल्यानंतरच पुढची भूमिका जाहीर करु असे मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नसल्याळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आता काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेना आता काँग्रेस राष्टेय्रवादीला पाठिंबा देणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS