लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी तयार, ‘यांना’ मिळणार संधी ?

लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी तयार, ‘यांना’ मिळणार संधी ?

नवी दिल्ली आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपांचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून आता उमेदवारांची नावे घोषि केली जाणार आहेत. काँग्रेसमधील काही उमेदवारांची नाव लवकरच पक्षाकडून घोषित केली जाणार आहेत. यामधील काही संभावित उमेदवारांची नावं समोर आली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातूनअमर काळे यांना वर्धा लोकसभामतदार संघातून उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच प्रफुल्ल गुडधे-पाटील यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून, नितीन राऊत यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून, मुकूल वासनिक यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून,माणिकराव ठाकरे यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून, जीवन पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून राहुल बोंद्रे यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून तर नामदेव उसेंडी यांना गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे अकोल्याची जागा भारिपचे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडली जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये काँग्रेसाचा बालेकिल्ला भाजपने हिसकावून घेतला होता. यामुळे 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आत्तापासूनच रणनिती आखली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या हातून हे मतदारसंघ पुन्हा मिळवण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक गाजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS