राहुल गांधी आणि माझ्यामध्ये तसं काही नाही, ते माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे -काँग्रेस आमदार

राहुल गांधी आणि माझ्यामध्ये तसं काही नाही, ते माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे -काँग्रेस आमदार

नवी दिल्ली   काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माझ्यामध्ये तसं काही नसून ते माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत असं वक्तव्य काँग्रेसच्या आमदार अदिती सिंग यांनी केलं आहे. अदिती सिंग यांचं राहुल गांधींसोबत लग्न ठरलं असल्याची अफवा पसरवली जात होती परंतु ‘तथ्यहीन अफवा ऐकून मी खरंच नाराज आहे. राहुलजी माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांना सन्मानाने राखी बांधते. आमच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या वावड्या उठवणारे चुकीचे आहेत. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे’ असं अदिती सिंग यांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान अदिती सिंग या उत्तर प्रदेशातील रायबरेली विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. ‘कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष विचलित करण्यासाठी हा डाव रचला जात आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता’ अशी टीकाही अदिती यांनी केली आहे.

राहुल गांधी, अदिती आणि त्यांच्या कुटुंबाचा एकत्रित फोटो शनिवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘राहुल गांधींना अखेर सुयोग्य जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत’ अशा आशयाचं कॅप्शन फोटोला जोडण्यात आलं होतं. त्यानंतर अदिती यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली असून ‘अफवा पसरवणाऱ्यांनी सावध राहावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

COMMENTS