राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मदत,  राहुल गांधींवर आरोप करत काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा!

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मदत, राहुल गांधींवर आरोप करत काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा देत भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. अल्पेश ठाकोर आणि धवन झाला अशी या दोन आमदारांची नावं आहेत. पक्षाचा हा व्हिप धूडकावत या दोन्ही आमदारांनी भाजपला मतदान केलं आणि पक्षाचा राजीनामा दिला. तसेच राहुल गांधी यांनी आपल्याला धोका दिला असल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अल्पेश हे काँग्रेसमध्ये नाराज होते. राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण पक्षात सन्मान नाही. वारंवार अपमानीत व्हावं लागतं अशी जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. मी माझ्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून मतदान केलंय. जो पक्ष देशाचा विकास करू शकतो अशा पक्षाच्या बाजूने आपण आहेयोत असंही ठाकोर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS