‘या’ मतदारसंघातील काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर, उमेदवारी अर्जही भरला नाही!

‘या’ मतदारसंघातील काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर, उमेदवारी अर्जही भरला नाही!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सोलापूरमधील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कारण काँग्रेस आमदार
सिद्धाराम म्हेत्रे यांनी आगामी निवडणुकीत उमेदवारी घेण्यासाठी पक्षाकडे अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

दरम्यान अक्कलकोट मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे विश्वासू श्रीकंठ शिवाचार्य महाराज यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याऐवजी पक्षाकडून श्रीकंठ शिवाचार्य यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर या मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचेच विश्वासू असलेले श्रीकंठ शिवाचार्य हे अक्कलकोट मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी दिली तर निवडून येणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS