काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या ४० जागांवर सहमती – शरद पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या ४० जागांवर सहमती – शरद पवार

औरंगाबाद – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या ४० जागांवर सहमती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पुणे, औरंगाबादसह इतर ८ जागांबाबत अजून तोडगा निघाला नाही. अशी माहितीही पवार यांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. पुणे आणि औरंगाबाद या जागांवर काँग्रेसला गेल्या काही वर्षात यश आलेलं नाही. त्यामुळे त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे. काँग्रेस मात्र या जागा सोडण्यास तयार नाही.

दोन्ही पक्षातले स्य़ानिक नेते या जागांवाबत चर्चा करतील. मात्र त्यांना तोडगा काढण्यास यश आलं नाही, तर आपण आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चर्चा करुन त्यावर तोडगा काढू असंही पवार यांनी सांगितलं. भाजप विरोधात ग्रँड अलायन्स करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पवार यांनी सांगितलं. पुणे आणि औरंगाबाद याशिवाय वादाच्या आणखी ६ जागा कोणत्या याविषयी उत्सुकता लागली आहे. तर पुणे आणि औरंगाबादबाबत काय निर्णय होतो याकडंही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मित्र पक्षाला कोणत्या आणि किती जागा सोडल्या जातात याकडंही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS