काँग्रेस, राष्ट्रवादीत ‘या’ मतदारसंघात होणार मैत्रिपूर्ण लढत !

काँग्रेस, राष्ट्रवादीत ‘या’ मतदारसंघात होणार मैत्रिपूर्ण लढत !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित आले आहेत. या दोन्ही पक्षांकडून जागावाटपही करण्यात आले आहे. या जागावाटपानंतर काही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने आले असल्याचं दिसत आहे.

पंढरपूर मतदारसंघ

आघाडी असतानाही पंढरपूरमधून दोन्ही काँग्रेसने एकमेकाविरोधात उमेदवार दिले आहेत. काँग्रेसमधून नुकतेच आलेले भारत भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी भाजपाने माजी आमदार सुधाकर परिचारक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.

गडचिरोली, अहेरी मतदारसंघ

गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघातही काँग्रेस-राष्ट्रवादीत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना उमेद तरी दिली आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार असताना काँग्रेसनंही या मतदारसंघासाठी दीपक आत्राम यांना तिकीट
दिलं आहे.

या मतदारसंघात भाजपच्या तिकीटसाठी
धर्मरावबाबा आणि अम्ब्रिशराव अत्राम यांच्यात
चढाओढ निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरापासून येथील वातावरण ढवळून निघाले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा विद्यमान आमदार अम्ब्रिशराव यांना भाजपने तिकीट दिल्याचे जाहीर केले. तर धर्मरावबाबा अत्राम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकीट दिले य. परंतु हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात असतानाही काँग्रेसने या मतदारसंघासाठी दीपक आत्राम यांना काँग्रेसने तिकीट दिले. त्यामुळे या मतदारसंघात आता तीन अत्रामांमध्ये लढत होणार आहे.

COMMENTS