राष्ट्रवादीला हवा 50-50% चा फॉर्म्युला, तर काँग्रेसला हवा ‘हा’ फॉर्म्युला !

राष्ट्रवादीला हवा 50-50% चा फॉर्म्युला, तर काँग्रेसला हवा ‘हा’ फॉर्म्युला !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या या पहिल्या बैठकीत मतमतांतरे झाल्याचं पहावयास मिळाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं 50-50 टक्के जागा वाटप व्हावे अशी मागणी काँग्रेसकडे केली आहे. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील निकालावर आधारीत जागा वाटप व्हावे अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

दरम्यान 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्या अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. यानुसार काँग्रेसने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या 42 आणि काँग्रेस उमेदवार दोन क्रमांकावर असलेल्या 64 अशा 106 जागा थेट काँग्रेसला मिळव्या, तर राष्ट्रवादीने जिंकलेल्या 41 आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दोन क्रमांकावर असलेल्या 54 अशा 95 जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात. उरलेल्या 87 जागांच्या वाटपावर काँग्रेस – राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांमध्ये चर्चा व्हावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. त्यामुळे आता यावर काय मार्ग काढला जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS