लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय !

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसनं घेतला ‘हा’ निर्णय !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाने आता पुढील महिनाभर वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव कार्यकारिणीने एकमताने फेटाळला होता.
राहुल गांधी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परंतु राहुल गांधी यांची ज्येष्ठ नेत्यांकडून मनधरणी केली जात आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुढील महिनाभर वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊ नये, असे निर्देश पक्षाच्या प्रवक्त्यांना दिले आहेत. याबाबत रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे पुढील महिनाभर काँग्रेसचे प्रवक्ते वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार नाहीत.

COMMENTS