काँग्रेसच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघावर ‘या’ अभिनेत्रीनं केला दावा !

काँग्रेसच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघावर ‘या’ अभिनेत्रीनं केला दावा !

मुंबई –  काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला मिळणार याबाबत काँग्रेस पक्षात अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. या जागेसाठी काँग्रेसमधील काही दिग्गज नेते इच्छुक आहेत. काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर आणि तेलंगणचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन देखील या जागेवर इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या जागेवर अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगरमा यांनी दावा केला आहे.

अभिनेत्री नगमा

उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावर माझा पहिला दावा असल्याचं अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी म्हटलं आहे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी इथे( वांद्रे) वाढले, शिकले, करियर केलं. त्यामुळे इथे माझा पहिला दावा असल्याचं नगमा यांनी म्हटलं आहे. नगमा यांनी 2014 मध्ये मध्यप्रदेश मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी आता उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यांच्यासोबत या जागेवर कृपाशंकर सिंह यांचही नाव चर्चेत आहे. त्यामुळे राहुल गांधी या मतदारसंघात कोणाला संधी देणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS