निवडणुकीनंतर युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरेल, पवारांच्या या विधानावर काँग्रेसची प्रतिक्रिया !

निवडणुकीनंतर युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरेल, पवारांच्या या विधानावर काँग्रेसची प्रतिक्रिया !

मुंबई – निवडणुकीनंतर युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. शरद पवारांच्या या विधानावर काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली असून पवारांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलं,ते त्यांचं मत आहे असं वक्तव्य काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलं आहे. मी माझ्या पक्षाचा सेक्रेटरी आहे, आमच्या जागा जास्त येऊन राहुल गांधी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही मेहनत घेतोय तसेच अशोक चव्हाण प्रयत्न करत आहेत असंही खर्गे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सर्व पक्षांनी एकत्रित येऊन सोबत निवडणुका लढवल्या पाहिजेत परंतु यात इगो नसला पाहिजे. तसेच हे वातावरण कोणी तोडायला नको. कर्नाटकमध्ये भाजपला लांब ठेवायला छोट्या पक्षाला संधी दिली,विचारधारा विरोधात लढण्यासाठी निर्णय घेतला,हा त्याग केला, असं सगळ्यांनी करायला हवं असही खर्गे यांनी म्हटलं आहे. माझे विचार आहेत, माझा नेता पंतप्रधान व्हावा. पंतप्रधान पदाबाबत निवडणुकीनंतर ठरवले जाईल हा विचार त्यांचा आहे. निवडणुकीनंतर जे होईल ते ठरेल. पण आमचा पक्ष सत्तेत यावा, आमचा नेता पंतप्रधान व्हावा असं मला वाटतं असंही खर्गे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS