काँग्रेसची दिल्लीत बैठक, बैठकीदरम्यान राज्यातील आणखी एका नेत्यानं दिला राजीनामा!

काँग्रेसची दिल्लीत बैठक, बैठकीदरम्यान राज्यातील आणखी एका नेत्यानं दिला राजीनामा!

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचललं आहे. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस सचिव आणि काँग्रेसचे राजस्थान सह-प्रभारी तरुण कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे वर्षा गायकवाड, राजीव सातव, केसी वेणुगोपाल, रजनी पाटील यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित आहेत.

दरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षपदी न राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. यासाठी काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनी आणि जवळपास 120 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातच आता किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भर पडली आहे. त्यामुळे पटोले यांचा राजीनामा राहुल गांधी स्वीकारणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS