काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण चेहरा

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण चेहरा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा जोरात सुरु आहे. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. या वृत्ताने त्यांनी खंडन करून मंत्रीपदासह आपल्यावर 3 महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आपणच पक्षश्रेष्ठींशी बोलून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवल्याचंही थोरात यांनी सांगितलं. तसंच तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असंही पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचं थोरात म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा होऊ लागल्याने काँग्रेसमधील काही नेत्यांची नावंही समोर आली आहेत. दोन दिवस बाळासाहेब थोरात दिल्लीमध्ये होते. त्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चा सुरू होती. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद असल्याने त्यांना पक्षासाठी हवा तसा वेळ देणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असून राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष देण्यात येणार आहे

सध्या काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS