काँग्रेसची उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर, ‘या’ उमेदवारांना दिली संधी !

काँग्रेसची उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर, ‘या’ उमेदवारांना दिली संधी !

चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केली असून काँग्रेसकडून तीन जागा तर राष्ट्रवादीकडून तीन जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. परभणीतून सुरेश देशमुख, अमरावती अनिल माधव गाडीया,  चंद्रपूरमधून इंद्रकुमार बालमुकुंद सराफ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगलीमध्ये या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार
उस्मानाबाद-बीड-लातूर – रमेश कराड (राष्ट्रवादी)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

नाशिक – शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली  – इंद्रकुमार सराफ

परभणी-हिंगोली – सुरेश देशमुख,

अमरावती – अनिल माधव गाडीया,

विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार
विपुल बजोरिया – हिंगोली-परभणी

नरेंद्र दराडे – नाशिक

राजीव साबळे- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

 

 

 

COMMENTS