राधाकृष्ण विखेंना शह देत बाळासाहेब थोरात यांना ताकद देण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न ?

राधाकृष्ण विखेंना शह देत बाळासाहेब थोरात यांना ताकद देण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न ?

शिर्डी – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना शह देत बाळासाहेब थोरात यांना ताकद देण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून सुरू झाले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. याचं कारण म्हणजे  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डीऐवजी त्यांचे अंतर्गत विरोधक मानले जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर इथं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची सभा होत आहे. यावरुन काँग्रसकडून वेगळे संकेत दिले जात असल्याची आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव  सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील हे पाक्षापासून दुरावले आहेत. त्यातच राधाकृष्ण विखेंना बाजूला सारून नेते होण्याची बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे. अशातच आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डीऐवजी बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर इथं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची सभा होत आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये लाजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

COMMENTS