पुण्यात कोरोनाचा विळखा, महापौरांपाठोपाठ उपमहापौर आणि 6 नगरसेवकांना कोरोनाची लागण,   दोन खासदार, चार आमदार होम क्वारंटाईन !

पुण्यात कोरोनाचा विळखा, महापौरांपाठोपाठ उपमहापौर आणि 6 नगरसेवकांना कोरोनाची लागण, दोन खासदार, चार आमदार होम क्वारंटाईन !

पुणे – पुण्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. महापौरांपाठोपाठ आता उपमहापौर सरस्वती शेडगे आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते यांच्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुण्यातील दोन खासदार, चार आमदार यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.नुकतोच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता उपमहापौर यांच्यासह सहा नगरसेवक यांना कोरोना झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम कमी केले आहेत. त्यासोबत काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे.

दरम्यान पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिका कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेच्या तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता सर्व नागरिकांना महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

COMMENTS