भाषण देऊन परतणा-या युवक काँग्रेसच्या नेत्याची जीभ छाटली !

भाषण देऊन परतणा-या युवक काँग्रेसच्या नेत्याची जीभ छाटली !

रायपूर – भाषण देऊन परतणाऱ्या युवक काँग्रेसच्या एका नेत्याची जीभ कापण्यात आली असल्याची घटना घडली आहे. राहुल दानी असं जीभ छाटण्यात आलेल्या नेत्याचं नाव आहे. या घटनेनंतर राहुल दानीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते तीन दिवस कोमात होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच हे कृत्य केलं असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

दरम्यान छत्तीसगडच्या बेमतरा जिल्ह्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र चौबे यांच्या समर्थनार्थ राहुल दानी या युवा नेत्याने भाषण दिले होते. हे भाषण दिल्यावर तो परतत होता. त्या वेळी त्याच्यावर हल्ला करून त्याची जीभ छाटण्यात आली. राहुल दानीची जीभ कापली गेल्याची घटना 31 ऑक्‍टोबरला घडल्याचे समजते. भाषण करून परतताना राहुल एका ढाब्यावर जेवणासाठी थांबला. त्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची जीभ कापण्यात आली असल्याची माहिती आहे.

COMMENTS