तरीही नारायण राणे आणि त्यांचा मुलगा यातून बोध घेत नाहीत – दीपक केसरकर

तरीही नारायण राणे आणि त्यांचा मुलगा यातून बोध घेत नाहीत – दीपक केसरकर

मुंबई – गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनेक निवडणुकांमध्ये पराभव पदरी पडल्यानंतरही, नारायण राणे आणि त्यांचा मुलगा त्यातून बोध घेत नाहीत. आजही ते पूर्वीसारखंच बोलत आहेत. त्यामुळे यावेळीही जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान निलेश राणेंनी थेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नारायण राणेंनी तो दावा फेटाळला असला, तरी शिवसेनेनं नीतीमत्ता सोडून स्वार्थासाठीच युती केल्याची टिप्पणी त्यांनी केलीय. त्यालाच उत्तर देत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे. अनेक निवडणुकांमध्ये पराभव पदरी पडल्यानंतरही, नारायण राणे आणि त्यांचा मुलगा त्यातून बोध घेत नाहीत. आजही ते पूर्वीसारखंच बोलत आहेत. त्यामुळे यावेळीही जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS