दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य!

दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी तयार असल्याचं म्हटलं आहे. तसेच ही यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री

अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, दत्ता भरणे, किरण लहामटे

काँग्रेसचे संभाव्य मंत्री

के. सी. पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, पश्चिम महाराष्ट्र,विश्वजित कदम,प्रणिती शिंदे, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, अमिन पटेल

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार

रवींद्र वायकर सुनील प्रभू, अनिल परब, प्रताप सरनाईक, डॉ.बालाजी किणीकर, उदय सामंत, दीपक केसरकर, भास्कर जाधव, संजय राठोड, आशिष जयस्वाल, बच्चू कडू, ( अपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिलेले), गुलाबराव पाटील, दादा भुसे, सुहास कांदे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, डॉ.संदीपन भुमरे, राहुल पाटील, तानाजी सावंत, शंभूराजे देसाई, प्रकाश अबिटकर,
डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे.

COMMENTS