मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतक-याचा दिल्लीत मृत्यू !

मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतक-याचा दिल्लीत मृत्यू !

नवी दिल्ली – विविध मागण्यांसाठी देशभरातील शेतक-यांनी दिल्लीमध्ये मोर्चा काढला आहे. या मोर्चात देशभरातील शेतक-यांनी सहभाग घेतला आहे. कालपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून आज या मोर्चाला गालबोट लागलं आहे.या मोर्चात सहभागी झालेल्या कोल्हापूरमधील शेतकऱ्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. किरण गौरवाडे (वय 52) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान दिल्लीत शुक्रवारी देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले होते. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले किरण गौरवाडे (वय 52) हे देखील मोर्चासाठी दिल्लीत गेले होते. शनिवारी सकाळी पहाडगंज येथील आंबेडकर भवनातील तिसऱ्या मजल्यावरुन पडून किरण गौरवाडे यांचा मृत्यू झाला.

शनिवारी संध्याकाळी गौरवाडे यांचे पार्थिव कोल्हापूर येथे विमानाने दाखल होणार असून रात्री उशिरा किंवा रविवारी ( दि २ डिसेंबर)त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इतर कार्यकर्तेही शनिवारी संध्याकाळी दिल्लीहून निघणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खा राजू शेट्टी यांच्यासह किसन संघर्ष समितीच्या सदस्यांनी गौरवाडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

COMMENTS