“जन जन की यहीं पुकार, दिल्ली में भी शरद पवार !”

“जन जन की यहीं पुकार, दिल्ली में भी शरद पवार !”

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसनं आज दिल्लीमध्ये संविधान बचाव रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीदरम्यान कॉन्स्टिट्युशन क्लब ते राष्ट्रपती भवनपर्यंत राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या मोर्चा काढणार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने एका कार्यक्रमात भाजप सरकारच्या कामगिरीबद्दल व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये कर्नल पुरोहित, माया कोडणानी यांची सुटका केल्याबद्दल दाखवले आहे. तर कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांची हत्या करणारे मोकाट असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान यावेळी जन जन की यहीं पुकार, दिल्ली में भी शरद पवार अशा घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. तसेच यावेळी शरद पवारांना पंतप्रधान बनवणार असल्याचे संकेतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिले आहेत. दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचं दिसत असून भाजप सरकारविरोधात व्हिडीओ दाखवण्यात येत आहेत. विविध मुद्द्यांवरुन दाखवण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

COMMENTS