फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन, दोन निर्णयांबद्दल केलं कौतुक!

फडणवीसांनी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं अभिनंदन, दोन निर्णयांबद्दल केलं कौतुक!

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या दोन निर्णयांबद्दल फडणवीसांनी कौतुक केलं आहे. सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) ला पाठिंबा दिल्याबद्दल आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं जाहीर अभिनंदन केलं आहे.

दरम्यान विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी
विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी गदारोळ केला आहे. शेतकरी कर्जमाफीमध्ये स्पष्टता नाही, किती शेतकऱ्यांना मिळणार माहित नाही, महिलांवरील अत्याचार वाढलेत, त्या सर्वांवर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
तसेच भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

COMMENTS