पवारांनी नेहमीच तुमचा विश्वासघात केला, या विधानसभेलाही घात करतील – फडणवीस

पवारांनी नेहमीच तुमचा विश्वासघात केला, या विधानसभेलाही घात करतील – फडणवीस

बारामती – पवारांनी नेहमीच तुमचा विश्वासघात केला असून, या विधानसभेलाही ते तुमचा घात करतील असं वत्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांना उद्देशून केलं आहे. तुम्ही कितीही त्यांच्या (पवार) पालख्या उचला, तुमचा पराभव अटळ इसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार कांचन राहुल कुल यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्ताने इंदापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार राहुल कुल, उत्तम जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान हर्षवर्धन पाटील हे सध्या आघाडीचा धर्म पाळत असून, ते सुप्रिया सुळे यांचे काम करत आहेत. मात्र  लोकसभेला आघाडीची काम करायचे पवारांना साथ द्यायची आणि हेच पवार विधानसभेला हर्षवर्धन पाटलांचा घात करतात व त्यांना पाडतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु तरीही त्यांनी पवारांची साथ द्यायची ठरवलं आहे. हर्षवर्धन पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी आता तरी योग्य निर्णय घ्यावा. पवार यांनी तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे, ते यावेळीही  हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभेला घात करतील असंही यावळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS