बारामतीमध्ये फक्त कमळच फुलणार, मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना आव्हान !

बारामतीमध्ये फक्त कमळच फुलणार, मुख्यमंत्र्यांचं शरद पवारांना आव्हान !

पुणे – आगामी निवडणुकीत बारामतीमध्ये कमळच फुलणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. रावसाहेब पाटील सांगतात ती 43 वी जागा बारामतीची असती, आता चूक करायची नाही आता बारामतीमध्ये फक्त कमळ फुलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ही निवडणूक काही जणांसाठी पक्ष टिकवण्यासाठी, काहींसाठी  मुलं बाळांना इस्टेब्लिश करण्यासाठीची असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

दरम्यान 2020 ते 2035 ही भारतासाठी महत्त्वाची वर्ष आहेत. जर विकासात सातत्य राखलं तर आपण चीन आणि अमेरिकेच्या पुढे जाऊ पण जर मनमोहन सिंग सारखं सरकार आलं तर पॉलिसी पॅरलिसिसने पुन्हा नुकसान होईल असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

तसेच आम्ही पूर्ण ताकतीने लढणार असल्याचं सांगत यावेळी त्यांनी शिवसेनेला इशारा देखील दिला आहे. तसेच आम्ही 48 जागा लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आज पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत पुणे, बारामती व शिरुर लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलन पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.

COMMENTS