मुख्यमंत्री आणि शरद पवार येणार बारामतीत एकाच मंचावर !

मुख्यमंत्री आणि शरद पवार येणार बारामतीत एकाच मंचावर !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर येणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला केंद्र सरकारची ‘वयोश्री योजना’ बारामतीत यशस्वीपणे राबवण्याच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते एकत्रित येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘बारामती’ जिंकण्याचा निर्धार काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि पवार हे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी बारामती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही पूर्ण ताकदीने 48 जागांवर निवडणूक लढणार आहोत. मागच्या वेळी 42 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 43 जागा जिंकू आणि ही 43 वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता शरद पवार आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबत हे दोन्ही नेते एकमेकांवर फटकेबाजी करणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS