त्या सुंदर मुलीनं वाघाला कुत्रं समजून मारलं – धनंजय मुंडे

त्या सुंदर मुलीनं वाघाला कुत्रं समजून मारलं – धनंजय मुंडे

रायगड – राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेत आज सकाळी परिवर्तन यात्रेला सुरूवात झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाडमधील चवदार तळे इथं जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

या यात्रेदरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. जंगलातील एका वाघाचं  उदाहरण देत धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. जंगलातील वाघाला एक सुंदर मुलीगी आवडते. हे त्या मुलीच्या लक्षात येतं. ती मुलगीही वाघाला म्हणते तु मला आवडतोस. परंतु तुझ्या पंजाला नखं आहेत. ती मला लागली तर…हे ऐकूण तो वाघ त्याच्या पंजाचे नखं काढून टाकतो.

त्यानंतर तो पुन्हा मुलीजवळ जातो. मग ती मुलगी म्हणते मला तु खरच आवडतोस परंतु तुझे ते सुळे दात आहेत. ते मला लागले तर…त्यानंतर वाघाला तेही पटतं आणि तो जाऊन आपले दात पाडतो. त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण तर जंगलातले वाघ आहोत. आता ना नखं राहिली, ना दातं राहिली. त्यामुळे त्या वाघाचे कुत्र्यापेक्षा वाईट हाल होतात.

त्यानंतर त्याच वाघाला नंतर ती मुलगी दिसते. त्या मुलीला तो ओळखू येत नाही, त्यामुळे ती त्याला कुत्रा समजून काठीने बडविते. अशी गोष्ट् मुंडे यांनी सांगितली. त्यानंत हा वाघ कोण आणि ती मुलगी कोण हे मला विचारु नका, तेवढे समजण्याइतपत तुम्ही सुज्ञ आहात असंही धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं. हे ऐकताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला होता.

COMMENTS