एकीकडे राजीनाम्याची चर्चा, दुसरीकडे मुंडेचा जनता दरबार

एकीकडे राजीनाम्याची चर्चा, दुसरीकडे मुंडेचा जनता दरबार

मुंबई – बलात्काराच्या आरोपांनंतर अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपला दैनंदिन क्रम तसाच ठेवला आहे. या गंभीर आरोपांनंतरही ते वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावत आहेत. आज काल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता उपमुखमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत तर आज राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कार्यालयात जनता दरबारही घेतला.

धनंजय मुंडे यांनी आज सकाळपासूनच त्यांच्या सरकारी निवासस्थान चित्रकूट येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्याही भेटी घेतल्या. तसेच यानंतर त्यांनी दुपारी जनता दरबार घेतला. त्यांच्यावर होत असलेल्या आरोपामुळे तण-तणावातही मुंडे यांनी जनता दरबारमध्ये आपले कार्यालयीन काम करत होते.

आज दुपारी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर स्वरुपाचे असून पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मुंडे स्वतः राजीनामा देणार की शरद पवार यावर निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

COMMENTS