जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री भक्ती – शक्तीची परंपरा कायम, धनंजय मुंडे यांच्या हस्ते गहिनिनाथगडावर संत वामनभाऊंची महापूजा संपन्न!

जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री भक्ती – शक्तीची परंपरा कायम, धनंजय मुंडे यांच्या हस्ते गहिनिनाथगडावर संत वामनभाऊंची महापूजा संपन्न!

पाटोदा – प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामन भाऊ यांच्या ४४व्या पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक महापूजेला ना. धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून हजारो भविकांसह दर्शन घेतले व महापूजा केली. यावेळी देवस्थानच्या वतीने गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराजांनी श्री. मुंडे यांचे स्वागत करत आशीर्वाद दिले. गेल्या सोळा वर्षात श्री. मुंडे यांनी या परंपरेला एकदाही खंड पडू दिला नाही.

जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून दरवर्षी पुण्यतिथी सोहळ्याला धनंजय मुंडे आदल्या दिवशी मुक्कामाला येऊन कीर्तन श्रवण करतात व दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते संत वामनभाऊंच्या मूर्तीची महापूजा केली जाते. धनंजय मुंडे राज्याचे मंत्री झाल्यानंतरही १६ वर्षानंतरही ही परंपरा अबाधित आहे.

‘अध्यात्मिक ठिकाणावरून मी कधीही भाषणे करीत नाही परंतु गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी आपल्याला आज्ञा केल्यामुळे मी आपल्यासमोर उभा आहे. मंत्री म्हणून नव्हे तर वामन भाऊंचा भक्त म्हणून मी आपली आयुष्यभर सेवा करीन’, असे म्हणत श्री. मुंडे यांनी या सोहळ्याला उपस्थित प्रचंड जनसमुदायासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘मी गहिनीनाथगडाचा भक्त म्हणून गेली अनेक वर्षे वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतो, पुण्यतिथी दिवशी संत वामन भाऊंच्या महापूजेचा बहुमान हे माझे भाग्य असून, राज्याचा मंत्री म्हणून काम करताना संत वामनभाऊसारख्या वैराग्यमूर्तींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची व जिल्ह्यासह राज्यातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी शक्ती द्या’, अशी मागणी केल्याचे यावेळी श्री. मुंडे म्हणाले. यावेळी श्री. मुंडे यांच्यासह आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे, आप्पासाहेब राख, विठ्ठल सानप, राजपाल लोमटे, सुंदर गित्ते यांसह आदि उपस्थित होते.

दरम्यान ना. मुंडे हे काल (दि. १६) रात्रीच गहिनीनाथ गडावर मुक्कामाला आले होते. अहमदनगर ते गहिणींनाथगड या प्रवासात व गडावर आल्यानंतरही श्री. मुंडे यांचे स्वागत व निवेदन देण्याचे सत्र अगदी माध्यरात्रीपर्यंत व दुसऱ्या दिवशी सकाळीही सुरूच होते.

COMMENTS