‘तो’ अपघात नाही घातपातच, धनंजय मुंडेंनी व्यक्त केला संशय!

‘तो’ अपघात नाही घातपातच, धनंजय मुंडेंनी व्यक्त केला संशय!

मुंबई – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नाही हा घातपात असल्याचा संशय धनंजय मुंडे मुंडेंनी व्यक्त केला आहे. तसेच जोपर्यंत या प्रकरणाचा खुलासा होणार नाही तोपर्यंत याबद्दल संशय व्यक्त केला जाईलच असंही त्यांनी म्हटलं आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान ‘गोपीनाथ मुंडे हे माझे काका होते. आमच्यात रक्ताचे नाते होते. मुंडे साहेबाचं जेव्हा अपघात झाला त्यानंतर सीबीआयने चौकशी करून आपला अहवाल दिला. त्यात हा अपघात असल्याचं समोर आलं. त्यामुळे तो मान्य करणे साहजिकच आहे. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं त्या अहवालाबद्दल समाधान झाले नाही. चार वर्षात एका केंद्रीय मंत्र्यांचं निधन होतं, गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे की, धडक देणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे. यात कुणाला तरी शिक्षा झाली पाहिजे होती ? चार वर्षांत न्यायालयात काही झाले नाही. त्यांच्या पीएची, ड्रायव्हरची चौकशी का झाली नाही?’ असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

COMMENTS