ज्यांची भांडणंही विनोदी वाटतात, ते युध्दाची भाषा करतायत – धनंजय मुंडे

ज्यांची भांडणंही विनोदी वाटतात, ते युध्दाची भाषा करतायत – धनंजय मुंडे

अहमदनगर – सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानावरून देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून भागवत यांना फटकारल होत. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी संघातील स्वयंसेवकांच्या होणाऱ्या भांडणावर भाष्य करत भागवत यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आजपासून उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल आहे. यावेळी श्रीगोंदा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

अशी होतात संघातील स्वयंसेवकांची भांडणे

मी हि कधीकाळी संघाच्या शाखेत गेलो असल्याच सांगत धनंजय मुंडे यांनी भागवत यांच्या विधानाचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले ‘मला संघ आणि स्वयंसेवक माहित आहेत. यांच्यामध्ये होणारी भांडणे देखील कशी असतात हे माहित आहे. ह्यांची भांडणे म्हणजे एक म्हणतो ‘ये मला शिव्या येतात मी देईल हां !, तर दुसरा म्हणतो तुला येतात तशा मलाही येतात मीही देईल !. आता सैनिकांना काढून हे देशाच्या सीमेवर गेले तर एका बाजूने पाकिस्तान गोळ्या मारेल आणि हे म्हणतील ‘ये नको मारू हा नाहीतर मी पण मारेल !, यावरूनच हा देश कोठे चालला आहे हे दिसत आहे.

राज्यातील मंत्रिमंडळात एकही शेतकऱ्याचं पोर नाही

आम्ही शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कर्जमाफी दिल्याचा गवगवा केला. मात्र प्रत्यक्षात केवळ दीड लाखांची कर्जमाफी केली, ती देतानाही ऑनलाईनचा खुट्टा मारल्याची घणाघाती टीका यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. पुढे बोलताना ‘ऑनलाईनमुळे ज्याला कर्जमाफी पाहीजे त्यांना सपत्नीक लाईनमध्ये उभ केलं. सपत्नीक बोलवून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरचा सत्यनारायण प्रसाद वाटायचा होता का असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील मंत्रिमंडळात एकही शेतकऱ्यांच पोर नसल्यानेच अशा गोष्ठी घडत असल्याच ते म्हणाले.

COMMENTS