लक्षात ठेवा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल, धनंजय मुंडेंचा ‘शोले स्टाईल’ इशारा !

लक्षात ठेवा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल, धनंजय मुंडेंचा ‘शोले स्टाईल’ इशारा !

जामनेर ( जळगाव ) – सत्तेचा दुरूपयोग करून जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. दात तुटेपर्यंत मारले जात आहे. लक्षात ठेवा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आता तुमचे थोडेच दिवस आहे. मग तुमचं कसं होईल बघा, चून चूनके ……..! असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘शोले’तल्या धर्मेंद्र स्टाईल इशारा दिला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्प्यातील 11 व्या जामनेर येथील सभेत धनंजय मुंडे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी नुकतीच बारामती जिंकण्याची भाषा केली त्याचा समाचार घेतांना धनंजय मुंडे म्हणाले की , काही लोक  बारामती जिंकून दाखवेन म्हणतात , यांना बारामतीच्या नखाची तरी सर आहे का? जामनेरचे एक गाव तरी आदर्श करून दाखववा. अहो, जामनेरकरांना साधं पिण्याच पाणी सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही. काहीही करा पण बारामतीचा नाद करू नका असा इशारा दिला.

जामनेर नगरपालिकेचा निकाल खरंतर लोकशाहीची हार होती. ती लढाई होती धनशक्ती विरोधात जनशक्ती. पैसा, लागेल त्याला पैसे व इव्हीएम घोटाळा हे समीकरण जुळलं होतं. झोल्यामध्ये पैसे जमा करणाऱ्या पक्षाच्या येथील मंत्र्यांकडे  एका मताला हजारो रूपये मोजण्याची ऐपत कुठून आली? असा सवाल उपस्थित केला.

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, संजय गरुड, रविंद्र पाटील, संतोष चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS