बीड जिल्ह्याचा मागासलेपणा पुसण्यासाठी पुढील पाच वर्ष काम करू – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याचा मागासलेपणा पुसण्यासाठी पुढील पाच वर्ष काम करू – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड – बीड जिल्ह्याचा मागासलेपण असल्याचा कलंक कायमस्वरूपी पुसण्यासाठी पुढील पाच वर्ष आपण काम करू असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. धनगर समाज कर्मचारी महासंघ बीड जिल्हा यांच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षसानी माजी आमदार अमरसिंह पंडित , आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे , जिल्हा परिषद सभापती कल्याण अबुज यासह डॉ शिवाजी राऊत, चंद्रकांत नवले ,अंकुश निर्मळ, सुभाष राऊत ,अमर ढोले , माधव निर्मळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले चांगले काम करणाऱ्या गुणवंत कर्मचारी, शिक्षक आदींच्या पाठीवर पुरस्काराच्या रूपाने शाब्बासकीची थाप पडत आहे . यावेळी शाळा बांधकामासाठी स्वखर्च करणार्‍यांचे सत्कार करताना मला आनंद होतो. आहे त्यांचे काम कौतुकास्पद असून त्यांचा सत्कार करणे ही मोठी गोष्ट आहे.

ते म्हणाले, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहील. याबाबत ठाम आहे. शासनाने इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात देखील चांगले निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर देखील सकारात्मक विचार केला जाईल असे पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले.

यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते आदर्श शिक्षक गुणवंत कर्मचारी व समाज भूषण पुरस्कार मिळालेल्या पुरस्कार्थींचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .

COMMENTS