भाजपाच्या फॉर द फर्स्ट टाइम हॅशटॅगवर धनंजय मुंडे कडून हल्लाबोल !

भाजपाच्या फॉर द फर्स्ट टाइम हॅशटॅगवर धनंजय मुंडे कडून हल्लाबोल !

मुंबई – देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेला. कोटय़वधी जनतेचा पोशिंदा असलेला ‘बळीराजा’ ला आपल्या न्याय मागण्यांसाठी अक्षरशः रस्त्यावर उतरून रक्त सांडावं लागलं. दुर्दैवाने हे देशाच्या इतिहासात प्रथमच आणि मोदींच्या कार्यकाळात घडलं असं म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या #ForTheFirst time या ट्विटर वरील हॅशटॅग वर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षातील कार्याचा प्रचार करण्यासाठी भाजपने #ForTheFirstTime हा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला आहे मात्र #ForTheFirstTime
या ट्रेंडला दुर्दैवी म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

भाजपने गेल्या ७० वर्षात ज्या गोष्टी घडल्या नाहीत अशा गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात घडल्या असं म्हणत #ForTheFirstTime हा ट्रेंड बनवला. त्यात भाजपच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षातील कार्याचा प्रचार केला आहे.

मात्र राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या ट्रेंडला काऊंटर केले आहे. मुंडे यांनी गेल्या ७० वर्षात देशात कधीच अशा घटना घडल्या नाहीत अशा घटना ट्विटरवर मांडत खंत व्यक्त केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद, शेतकरी संप, शेतकरी लाँग मार्च, कर्जबुडवे मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी यांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी भाजपला धारेवर धरले आहे.

दुर्दैवाने #ForTheFirstTime
गेल्या ४५ वर्षातली सर्वांधिक बेरोजगारी मोदी सरकारं आणली. आणि ती आकडेवारी मॅनेज करण्यासाठी बेरोजगारीसंदर्भातला अहवाल सरकारनं रोखून धरला.

दुर्दैवाने #ForTheFirstTime
केंद्र सरकारने आपल्या कार्यकाळात जाहिरातींवर तब्बल ५२४५.७३ कोटी रुपये खर्च केले. मोदींनी इथे भेट दिली, मोदी इथे येणार आहेत, मोदींनी योगा केला, मोदींनी झाडू मारला… योजनेंच्या नावाखाली स्वत:च्या पक्षाचा प्रचार केला.

दुर्दैवाने #ForTheFirstTime
या देशात सरकारवर टीका करणं हा देशद्रोह समजला जातोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत आहे. पुरोगामी विचारांची कत्तल केली जात आहे.

दुर्दैवाने #ForTheFirstTime
चौकीदार की रहम से बेडा पार हो गया
गरीबो के पैसे ले ललित, मल्ल्या, निरव फरार हो गया असे शेवटचे ट्विट करत चिमटा काढला आहे.

धनंजय मुंडे आणि भाजपच्या ट्विटर जुगलबंदीमुळे ट्विटर ट्रेंडिंगमध्ये धनंजय वि. भाजप असा सोशल वॉर बघायला मिळत आहे.

COMMENTS