धनंजय मुंडेंनी रंगपंचमीच्या शुभेच्छा देत शिवसेना-भाजपवर साधला निशाणा!

धनंजय मुंडेंनी रंगपंचमीच्या शुभेच्छा देत शिवसेना-भाजपवर साधला निशाणा!

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा देत शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधला आहे. वेळोवेळी रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे. तसेच बुरा ना मानो होली है…असे म्हणत मुंडे यांनी युतीवर टिकास्त्र सोडले आहे. कभी तू फकीर लगता है, कभी आवारा लगता है, कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार लगता है असे ट्विट करत मुंडे यांनी मोदीवर निशाणा साधला आहे.

दरम्यान यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांच्या राजीनामा देण्यावरून मुंडे यांनी खोचक टीका केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या, खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या, सत्तेला लाथ मारून-मारून ‘दमलेल्या बाबाला’, वाघ-शेळीचा खेळ खेळत वेळोवेळी आपले रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्विट मुंडे यांनी केले आहे. तसेच नैसर्गिक रंगांचा वापर करुया, पर्यावरण पूरक धूलिवंदनचा आनंद लुटूया असे आवाहनही मुंडे यांनी ट्विटरवर केले आहे.

COMMENTS