बीडमध्येही सहाशे मतांचा फरक पडला, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप !

बीडमध्येही सहाशे मतांचा फरक पडला, धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप !

बीड – लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी मूळ मतदानापेक्षा अधिकचे मतदान मोजण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बीडमध्येही सहाशे मतांचा फरक पडला असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण मतदानापेक्षा 459 मते जास्त निघाल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.राजू शेट्टी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे.

दरम्यान निवडणूक विभागाकडून याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे याचा नेमका अर्थ सांगता येणार नाही. मात्र पुरावे हाती आल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी मदत म्हणून बारामतीतून पाठवलेल्या 21 टँकरचे धनंजय मुडे आणि रोहित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी मुंडे पत्रकारांशी बोलत होते.

COMMENTS