“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार!”

“गुन्हा दाखल होताच धनंजय मुंडे फरार होणार!”

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जोरदार टीका केली आहे.यंदाचं पावसाळी अधिवेशन ऐतिहासिक होणार आहे. कारण विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे गुन्हा दाखल होताच फरार होणार असल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करुन घेतल्याचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहे.औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून ऐन अधिवेशनाच्या तोंडावर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावरुन आता मुंडे यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे गुन्हा दाखल होताच फरार होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS