31 ऑगस्टला औरंगाबादमध्ये धनगर समाजाचा महामेळावा !

31 ऑगस्टला औरंगाबादमध्ये धनगर समाजाचा महामेळावा !

सांगली – आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे धनगर समाजानं महावेळाव्याचं आयोजन केलं असून 31 ऑगस्ट रोजी हा महामेळावा हमखास मैदानावर पार पडणार आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी  महाराष्ट्रातून तब्बल दहा ते पंधरा लाख समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातून 50 हजार धनगर समाज बांधव जाणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर युवा मंच सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल ठेंगील यांनी दिली आहे.

भाजपने सत्ता आल्यानंतर धनगर समाजास पंधरा दिवसात आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने त्याला विलंब लावला आहे. मागील सरकारने धनगड व धनगर वेगळा असल्याचे सभागृहात सादर केला आहे. जनजाती आयोगाने धनगड जमातीची खोटी माहिती दाखवून 70 वर्षांपासून धनगर समाजास आरक्षणापासून दूर ठेवलं आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सध्याचे आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,तसेच ही धनगड समाज कुठे आहे कसा आहे काळा दिसतो का गोरा दिसतो ते व त्यांचे पत्ते द्या नाहीतर आम्हाला 31 ऑगस्टला हमखास मैदानावर औरंगाबाद येथे एका धनगर पोराचा दाखला घेऊन सरकारचा प्रतिनिधी हमखास मैदाना वरती पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS