माझ्यावर विश्वास ठेवा परळीत आल्यावर मी नक्की भेटेतो – धनंजय मुंडे

माझ्यावर विश्वास ठेवा परळीत आल्यावर मी नक्की भेटेतो – धनंजय मुंडे

मुंबई – आजपर्यंत परळीतील प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मागील 10 वर्षांपासून मीच सोडवले आहेत, या पुढे ही मीच सोडवणार आहे, त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही असा विश्वास बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपोषणाला बसलेल्या प्रकलपग्रस्तांना दिला आहे. प्रकलपग्रस्तांच्या प्रश्नासाठी मागील आठवड्यात मुंबईमध्ये एक बैठक झाली, पुढील आठवड्यात ऊर्जा मंत्री यांच्यासोबत एक बैठक होणार असून त्यात सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज आहे, आशा वेळी आपले आणि कुटुंबियांचे जीव धोक्यात घालू नका , माझ्यावर विश्वास ठेवा आणि उपोषण मागे घ्या, तुम्हाला परळीत आल्यावर मी नक्की भेटेन असे धनंजय मुंडे म्हणाले.

बीडमध्येही 31 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद

संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या करुणा या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव बीड जिल्ह्यातील जनतेला होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच काळजी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या असून त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 18 कलमी सूचना जिल्ह्यातील प्रशासनाला केल्या आहेत .त्यानुसार जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय, आठवडी बाजार हेही 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एक पत्रक काढले असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्व चित्रपट ग्रह, जलतरण तलाव , व्यायामशाळा, नाट्यगृह, म्युझियम, सर्व क्रीडा संकुले जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय, पर्यटन स्थळे, आठवडी बाजार, जीवनावश्यक वस्तू व औषधे सोडून सर्व मोठे मॉल्स, शहरातील व ग्रामीण भागातील अंगणवाड्या शहर व ग्रामीण भागातील शाळा , महाविद्यालय सर्व शैक्षणिक अस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दहावी-बारावी व इतर परीक्षा मात्र विहित वेळापत्रकानुसार घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत.तसेच आजारी विद्यार्थ्यांच्या संपर्कात कोणी येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्हा परिषद अंतर्गत येणारी हंगामी वसतिगृह यामध्ये एका वेळी दहा पेक्षा जास्त विद्यार्थी एकाच ठिकाणी जेवण्यात बसणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

उद्योग माहिती तंत्रज्ञान व सेवेशी संबंधित कंपन्यांनी त्यांचे सर्वसाधारण कामकाजाशी संबंधित कामगारांना 31 मार्च 2000 पर्यंत ज्यांना शक्य असेल त्यांनी घरुनच काम करावे असे आवाहन केले आहे. याबाबतची खात्री कार्यकारी अभियंता औद्योगिक विकास महामंडळ बीड यांनी करावयाची आहे.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्रथम व द्वितीय वर्षाचे वर्ग 31 मार्चपर्यंत थांबावेत अशी सूचनाही करण्यात आली आहे. बँकांमधून पैसे काढणे व कर्ज हप्ते भरणे वगळता इतर सर्व सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात, एटीएम मशीनची स्वच्छता बाळगावी अशी सूचना करण्यात आली आहे .

सर्व आधार केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. पोस्ट ऑफिसला ही अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे कळविण्यात आले आहे.कोरोना आजारामुळे भयग्रस्त होण्याची गरज नाही मात्र सर्वांनी याची काळजी घेऊन हे संभाव्य संकट परतुन लावावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS