दिवाळीच्या सणात केली जाणारी एस.टीची भाढेवाढ रद्द करा –धनंजय मुंडे

दिवाळीच्या सणात केली जाणारी एस.टीची भाढेवाढ रद्द करा –धनंजय मुंडे

मुंबई – दिवाळीच्या सणात केली जाणारी एस.टीची भाढेवाढ रद्द करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्यात अभूतपूर्व दुष्काळ आहे, कोणताच सण साजरा करावा अशी जनतेची परिस्थिती नाही आणि त्यासाठी पैसाही नाही. त्यामुळे एस.टी. महामंडळाने दिवाळीच्या 20 दिवसात 10 % भाढेवाढ करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करुन जनतेला दिलासा दिला द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे

दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टीची सरसकट १०% भाडेवाढ केली जाते. यंदा १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसासाठी ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय एस. टी. महामंडळाने घेतला आहे. सरकारने राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घ्यावी, कारण एस.टीमधून फक्त गरीब, सर्वसामान्य प्रवास करतात, वाढीव भाड्याचा त्त्यांनाच भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे ती यावर्षी रद्द करावी अशी मुंडे यांची मागणी आहे.

शिवसेना सत्तेत असूनही कायम आपण जनतेच्या प्रश्नावर भांडत आहोत असा खोटा आव आणते, गरीब आणि सर्व सामान्य जनतेची त्यांना खरोखरच काळजी असेल तर त्यांच्या मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या खात्यातील दरवाढ रद्द करून दाखवावी असा आव्हानही मुंडे यांनी शिवसेनेला दिलं आहे.

COMMENTS