दिंडोरीत राष्ट्रवादीचं भाजपला तगडं आव्हान, तिरंगी निवडणूक होणार ?

दिंडोरीत राष्ट्रवादीचं भाजपला तगडं आव्हान, तिरंगी निवडणूक होणार ?

नाशिक – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच मतदारसंघात भाजपला तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून केला जात आहे. नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही भाजपला चारी मुंड्या चीत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून निकराचे प्रयत्न सुरु आहेत. या मतदारसंघात आदिवासी मतदार मोठ्याप्रमाणात असून गेली तीन निवडणुकांपासून याठिकाणी भाजपची सत्ता आहे. भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे गेली तीन निवडणुकांपासून याठिकाणी निवडून आले आहेत. परंतु आगामी निवडणुकीत मात्र चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तगडं आव्हान देण्याचं ठरवलं आहे.

दरम्यान चव्हाण यांना तगडं आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीनं तगडा उमेदवार देण्याचं ठरवलं आहे. काही दिवसांपूर्वीच दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनंजय महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून महाले किंवा डॉ.भारती पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

तसेच या मतदारसंघात माकपाचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी आदिवासी प्रश्नावर मागील वर्षी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला होता. त्यामुळे गावित यंदा खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी निवडमुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि कामप अशी तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

COMMENTS