वाढदिवसानिमित्त एकनाथ खडसेंनी केला सरकारविरोधात ‘हा’ संकल्प !

वाढदिवसानिमित्त एकनाथ खडसेंनी केला सरकारविरोधात ‘हा’ संकल्प !

जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोठळीमध्ये आज त्यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. आपण क्लीन चिट आहोत असं सरकार म्हणायला तयारी नाही. त्यामुळे आपण दोषी आहोत की नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत. असा संकल्प सरकारविरोधात करत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यानंतर मी दोषी असल्याचं जनतेनं सांगितलं तर राजकारण सोडून देणार असल्याचंही खडसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावरील अन्याय संपेल आणि त्यांना न्याय मिळेल असं म्हटलं आहे. तसेच राज्यात भाजपचं सरकार येण्यामागे एकनाथ खडसे यांचं मोठं श्रम असून अन्याय कुणावरही कायम नसतो. त्यातून न्याय मिळतो. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावरील अन्याय संपेल आणि त्यांना न्याय मिळेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS