एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू

एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अखेर आज चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) च्या कार्यालयात हजर झाले आहे. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या सुद्धा सोबत आहे.

एकनाथ खडसे यांना ३१ डिसेंबररोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते १४ दिवस विलगीकरण कक्षात होते. त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर आज सकाळी एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या देखील ईडी कार्यालयात दाखल झाल्या.

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहार हा शारदा खडसे यांच्या नावावर आहे. त्यामुळे शारदा खडसे यांची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर पदाचा दूरउपयोग करून व्यवहार केल्याचा आरोप आहे. तर आर्थिक व्यवहाराबद्दल शारदा खडसे यांच्यावर आरोप आहे.

COMMENTS