होय भुजबळांवर अन्याय झाला –एकनाथ खडसे

होय भुजबळांवर अन्याय झाला –एकनाथ खडसे

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याची भावना केवळ विरोधकांकडूनच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही व्यक्त केली जात आहे. भुजबळांवर अन्याय झाल्यामुळे ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी उभा राहत असून भुजबळांसोबत ओबीसींच्या समस्यासाठी एकत्रित लढा देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले. ओबीसी नेत्यांना दूर करण्याचं काम सुरु असून   ओबीसी समाजात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून  छगन भुजबळ ही पोकळी भरून काढतील असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान छगन भुजबळांना ओबीसीकडून मोठा प्रतिसाद मिळत असून मी भुजबळांना भेटणार असल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी समस्यावर भुजबळांसोबत एकत्र लढणार असल्याची घोषणाही एकनाथ खडसे यांनी केली आहे. भाजपने ओबीसी समाजाला आश्वासने दिली आहेत. तसेच धनगरांनाही आरक्षण देण्याचं वचनही भाजपनं दिलं आहे. परंतु चार वर्षे झाली आश्वासनं पूर्ण झाली नसून त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. आता आम्ही २०१९ निवडणूक विकासावर लढवण्याचं ठरवलं आहे. तसेच आता विकासाच्या मुद्द्यावर मत मागायचं, विकासाचा मुद्दा आला तर आश्वासनं काही उरत नाहीत, असा उपहासात्मक टोलाही एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे.

 

COMMENTS