…नाही तर विधानसभेत गोंधळ घालणार, एकनाथ खडसेंचा सरकारला इशारा !

…नाही तर विधानसभेत गोंधळ घालणार, एकनाथ खडसेंचा सरकारला इशारा !

जळगाव – भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. तो निधी उपलब्ध झाला नाही तर विधानसभेमध्ये गोंधळ घालणार असल्याचं एकना खडसे यांनी म्हटलं आहे. अंमळनेरमध्ये एकनाथ खडसेंच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी यापूर्वीही अनेकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे.  अनेकवेळा त्यांनी आपल्या मनातली खदखद जाहीरपणे बोलून दाखवली आहे. हिवाळी अधिवेशनातही त्यांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी विधानसभेत गोंधळ घालणार असल्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS