निवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक !

निवडणूक लढवणा-या उमेदवारांसाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक !

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता उमेदवारांना काही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्जासोबत सादर केल्या जाणा-या शपथपत्रात उमेदवारांना स्वतःच्या आणि त्यांच्यावर अवलंबित असणा-या सदस्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि उत्पन्न, कराराचे स्त्रोत यामध्ये नमूद करणे बंधनकारकर करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहापिया यांनी दिली आहे.

दरम्यान महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल् परिषदा, आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवारांना शपथपत्र सादर करावे लागते. या शपथपत्रात मालमत्ता आणि दायित्व, शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती द्यावी लागते. यासोबत आता स्वतःचे आणि उमेदवारावर अवलंबित असलेल्या सदस्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि कराराचे तपशील देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

COMMENTS