ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे काहींचे राजकारण सुरू – अशोक चव्हाण

ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे काहींचे राजकारण सुरू – अशोक चव्हाण

मुंबई -मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा लाभ ऐच्छिक असेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, काही मंडळी यावर राजकारण करीत आहेत.” असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

अशोक चव्हाण म्हणाले,, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मराठा आरक्षणास स्थगिती देण्यात आल्याने एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसेल तर नुकसान कमी करण्यासाठी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावे, अशी मागणी केली होती. या याचिकांवर औरंगाबाद व मुंबई खंडपीठाने मराठा समाजातील संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने यासंदर्भात भूमिका निश्चित करावी असेही न्यायालयाने सांगितले होते. एसईबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यास कायद्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. पैसे खर्च करून सर्व विद्यार्थी उच्च न्यायालयात जाऊन ही सवलत मिळवणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर एसईबीसी प्रवर्गाला ऐश्चिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

COMMENTS